ज्वारी अन् बाजरी होणार महाग, शेतकऱ्यांचे चारा पिकांकडे दुर्लक्ष



ज्वारी अन् बाजरी होणार महाग, शेतकऱ्यांचे चारा पिकांकडे दुर्लक्ष


नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्वारी आणि बाजरी या दोन पिकांचे भाव आता वाढणार आहेत. राज्यात यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी आणि बाजरी या पिकांची पेरणी कमी केली आहेत. राज्यात सिंचनाखाली असलेल्या जमिनीत शेतकरी आता चारा पिकांकडे दुर्लक्ष केले आहे अवघ्या 38 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी आणि बाजरी पिकाची पेरणी झाली आहे. यामुळे ज्वारी आणि बाजरी या पिकांचे उत्पादन घटुन, ज्वारी आणि बाजरी महाग होण्याची शक्यता आहे.


मागील काही वर्षांपूर्वी शेतकरी रब्बी आणि उन्हाळ्यात ही ज्वारी आणि बाजरी या पिकाची लागवड करत होते. पण अलीकडे सिंचनाखाली क्षेत्रातील शेतकरी आता भाजीपाला आणि नगदी पिकांकडे वळले आहे. यामुळे गुरांसाठी चाऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

पिकांचे दर : सध्या बजारसमितीमध्ये गव्हाचे दर अडीच हजार प्रतिक्विंटल आहेत. ज्वारीचा दर 4000 प्रतिक्विंटल आहे आणि बाजरीचा दर सरासरी 2000 हजार 500 रुपये प्रिक्विंटल इतका आहे. आता येणार काही दिवसात ज्वारी आणि बाजरी या पिकांचे दर वाढण्याची शक्यता आहे.



2 Comments

Previous Post Next Post