पुढील ५ दिवस राज्यात होणार अवकाळी पाऊस पहा कोठे होणार गारपीट.


२०२३ वर्षी कसा असणार पाऊस जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील ५ दिवस राज्यात होणार अवकाळी पाऊस पहा कोठे होणार गारपीट.

नमस्कार शेतकरी मित्रांनो अचानक वातावरणात बदल झाल्याने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील दहा दिवस राज्यात पाऊस पडणार आहे. उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी हवामान अंदाज सांगितला आहे.

राज्यात २५ एप्रिल पासून अनेक ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख साहेब यांनी सांगितले की राज्यात पश्चिम महाराष्ट्र दिनांक २५, २६, २७ एप्रिल या तारखेला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विदर्भ , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. राज्यात येत्या ४ मे पर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ मराठवाड्यात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे असे पंजाबराव डख साहेबांनी सांगितले आहे.

पुढील काही दिवसात राज्यामध्ये अवकाळी गारपीट आणि विजांच्या कडक्यासह पाऊस होणार आहे त्यामुळे शेतातील गुरांना पाच सहा दिवस वातावरण पाहून निवाऱ्या ला बांधावे. पाऊस सुरू असताना झाडाखाली वीज पडण्याची भीती असते म्हणून झाडाखाली थांबू नये. मोबाइलच्या टावर पासी असताना फोन लाऊ नये. गुरांना झाडाला बांधू नये. तळे, नदी अश्या पाण्याच्या ठिकाणी थांबु नये.

Previous Post Next Post