शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये जमा होण्यास झाली सुरुवात

 



शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये जमा होण्यास झाली सुरुवात जाणुन घ्या कसे.


नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण कश्याचे पैसे ? कसे जमा होणार ? या प्रश्नांची उत्तरे आपण याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत. 


शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. तसेच राज्यसरकार च्या तर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांसाठी नमो ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने मार्फत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. याची उत्सुकता पाहता आता येणाऱ्या पुढील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने चा हप्ता आणि नमो सरकार योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.


Pm Kisan kyc : शेतकरी बांधवांनो सरकारने चालु केलेल्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे ज्या शेतकऱ्यांना पैसे येतात त्यांच्या खात्यामध्ये नमो या योजनेचे पैसे जमा होणार त्यासाठी तुमची ई केवायसी पुर्ण झालेली पाहिजे. जरी कोणाची ई केवायसी राहिली असेल त्यांनी pm Kisan या संकेतस्थळाला भेट देऊन ई केवायसी पुर्ण करुन घ्यावी.


नमो योजने अंतर्गत लवकरच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आणि pm Kisan योजनेचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. नमो योजनेचे पैसे शेतकऱ्यांना लवकर भेटतील असे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनात सांगितले आहे.


या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 2.5 हेक्टर जमीन असलेले शेतकरी पात्र राहतील. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

इ केवायसी पुर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा.

1 Comments

Previous Post Next Post