2023 यावर्षीचा मान्सून असा असणार आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब सांगतात की..
नमस्कार शेतकरी बांधवांनो 2023 या चालु वर्षी हवामान अंदाज कसा असणार आहे ? मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी येणार ? शेतकऱ्यांची पेरणी कधी होणार ? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले पंजाबराव डख साहेब यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की...
हवामान अंदाज : शेतकरी बांधवांनो पंजाबराव डख साहेब सांगतात की यंदा जुन महिन्याच्या सुरुवातीला मान्सून केरळ राज्यातून सुरू होणार आणि महाराष्ट्रामध्ये आठ जुनला मान्सून येणार. ते असे म्हणतात की जुन महिन्यात सत्तावीस, अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सोयाबीन, कापूस, तुर या पिकांची पेरणी होणार. यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज डख साहेबांनी दिला आहे.
2023 या वर्षी चांगला पाऊस पडणार
आहे. डख साहेब सांगतात की ऑक्टोबर महिन्यांमध्ये देशात थंडी येणार आहे. हा अंदाज पण शेतकऱ्यांनी लक्ष्यात घेतला पाहिजे नंतर ते सांगतात नोव्हेंबर महिन्यामधये दिवाळी सणाला पण पाऊस पडणार आहे. असा यंदाचा मान्सूनचा हवामान अंदाज पंजाबराव डख साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला.
अश्या पदधतीने 2023 या वर्षीचा हवामान अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष्यात घ्यावा. धन्यवाद.

Nice
ReplyDelete