तुमच्या मोबाईल वर फक्त गट नंबर टाकुन पाहु शकता तुमच्या जमिनीचा नकाशा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या जमिनीचा नकाशा तुम्ही आता तुमच्या मोबाईल वर पाहु शकता. तुमच्या जमिनीला वाट कुठून आहे. ? तुमच्या जमिनीचं क्षेत्र किती आहे. ? आज आपण या सर्व प्रश्नांचे उत्तर या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत.
शेतकरी बांधवांनो सरकारने सातबारा आणि आठ ऑनलाईन केलं आहे तसंच आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आता ऑनलाईन तुमच्या जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे.
Online land record : सर्व शेतकरी बांधवांनी खाली दिलेल्या सरकारी संकेतस्थळ म्हणजे दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर सरकारी महाभुमिलेखाच पोर्टल ओपन होईल. जर तुमचे क्षेत्र शहरात असेल तर अर्बन हा पर्याय निवडा आणि जर तुमचे क्षेत्र गावामध्ये असेल तर रुरल हा पर्याय निवडा. तेथे दिलेल्या सूचनेनुसार पाहिले तुम्ही तुमचे राज्य निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, नंतर तालुका निवडून तुमच्या गावाचे नाव निवडा आणि सबमिट करा. खाली दिलेल्या पोस्टल कोड म्हणजे तुमच्या सातबऱ्यावरील गट नंबर टाका. गट नंबर टाकल्यावर search या बटणावर क्लिक करा. लगेच खाली आलेल्या नकाशावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहु शकता. तिथं दिलेल्या (+) अधिक या चिन्हावर दाबून तुम्ही नकास्याची साइज माठी करू शकता आणि (-) वजा या चिन्हावर दाबून तुम्ही नाकास्याची सायझ लहान करून पाहु शकता.

Fog
ReplyDelete