Ram Mandir Ayodhya : २२ जानेवारी प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळेच आयोजन कसं असणार सविस्तर माहिती



Ram Mandir Ayodhya: अयोध्येत मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरू आहे 22 जानेवारीला प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय आयोध्या पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोधेत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.सी एम आदित्यनाथ योगी संपूर्ण तयारीचा आढावा घेनार आहेत. या कार्यक्रमासाठी काशी विश्वनाथ आणि वैष्णव देवी मंदिराच्या प्रमुखां सोबतच सुमारे 4000 संतांना आमंत्रण दिले गेले आहे. सध्या राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी चार हजार पेक्षा जास्त लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा साठी तीन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्या तीन मुर्तींपैकी पैकी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र सदस्य लवकरच एका मूर्तीची निवड करतील पण या सोहळ्याला कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहेत ? प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काय असेल ? गाभाऱ्यात कोण असेल ? तुम्ही जाऊ शकता का ? अश्या दहा महत्वाच्या गोष्टी या लेखातून मी तुम्हाला सांगणार आहे.

सर्वात पहिला मुद्दा अभिषेक सोहळ्याच्या प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. मात्र सर्व विधी 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे जानेवारीला मकर संक्रांतीनंतर सर्व विधी सुरू होतील. 15 जानेवारीला गर्भगृहात रमललांच्या मूर्तीची म्हणजे भगवान श्रीरामांच्या बालक स्वरूपाची मूर्ती स्थापन केली जाईल. यासाठी अनुष्ठान आणि पूजा की एक आठवडा आधी सुरू होईल. गणेश शास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा सहा दिवस आधी कार्यक्रमाचे आयोजन :

१)  शहराच्या दौऱ्यावर होणार 17 जानेवारीला श्री रामलंला ची मुर्ती नगर प्रदक्षिणा करण्यास बाहेर काढण्यात येईल.

२) यानंतर 18 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू होईल. 

३) 19 जानेवारीला राम मंदिरात यज्ञ अग्नी कुंड गर्भगृहात स्थापन करण्यात येईल. 

४) 20 जानेवारीला 81 कलश नदीच्या पाण्याने गर्भगृह स्वच्छ धुऊन संपूर्ण वास्तू ची पूजा केली जाईल.

५) 21 जानेवारीला रामलल्ला ला 125 तीर्थ क्षेत्रातील पाण्याने अंघोळ घातली जाईल.

६) शेवटी २२ जानेवारीला मध्यान मृग या नक्षत्रात रामालल्ला च्या मूर्तीचा अभिषेक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार असतील.

या समारंभासाठी कोण कोण उपस्थित असणार आहे :

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य भगवान श्रीराम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी माननीय पंतप्रधान मोदींसोबत अजून पाच लोक गर्भगृहात उपस्थित असतील. यात पीएम मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित असतील. यशिवाय संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्य आचार्य गर्भगृहात उपस्थित असतील. सर्वात आधी पीएम मोदी भगवान श्री रमांचा चेहरा आरश्यात दाखवतील. सोहळ्या दरम्यान मंदिराचा पडदा बंद राहील.


श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि आचार्याच्या तीन पथकांची निर्मिती 

मंदिरात प्राणप्रतिष्ठा दरम्यान पूजा कार्यक्रमासाठी आचार्यांच्या 3 संघ तयार केले आहेत. पहिल्या संघाचे नेतृत्व स्वामी गोविंद देवगिरी करतील. दुसऱ्या संघाचे नेतृत्व कांची कमकोठी पिठाचे शंकराचार्य स्वामी वीजयेंद्र सरस्वती करतील आणि तिसऱ्या संघात काशीतले वीस विद्वान असतील.

अभिषेकासाठी असलेली 84 सेकंड ची शुभवेळ :

अभिषेकासाठी ८४ सेकंदाचा शुभ वेळ निश्चित करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदाचा छोटासा शुभ वेळ निश्चित करण्यात आली आहे. २२ जानेवारी या दिवशी राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्ला ची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. काशीचे ज्योतिष पंडित गणेश शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढला आहे. प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त बारा वाजून 29 मिनिटांनी 8 सेकंदात पासून सुरू होईल आणि 12:30 मिनट नंतर 32 सेकंदांपर्यंत हा चालू राहील. प्रतिष्ठापना सोहळा पूर्ण होईपर्यंत रमलल्ला यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल. प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर ही पट्टी काढली जाईल. 


या सोहळ्यासाठी अयोध्येत 7000 पाहूने येणार आहेत. राम जन्मभुमी ट्रस्ट ने अभिषेक सोहळ्यासाठी 7000 पाहुण्यांना आमंत्रित केल आहे. यामध्ये तीन हजार व्हीव्हीआयपी आणि चार हजार संतांचा समावेश आहे. या सोहळ्यासाठी विविध पक्षांचे राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, पुजारी आणि इतर धर्म गुरुं सोबतच समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकारण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय क्रिकेट क्षेत्रातून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना देखील आमंत्रण पाठवले गेल आहे. त्याच बरोबर फिल्म इंडस्ट्री मधून अमिताभ बच्चन, कंगना राणावत, अरुण गोविंद, दीपिका चिखलिया यांचे नाव समोर येत आहे.

तसेच रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांना बिझिनेस क्षेत्रातून आमंत्रण पाठवलं आहे. 

या कार्यक्रमासाठी योगगुरू स्वामी रामदेव यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

श्रीरामांच्या जुन्या मूर्तीच काय होणार :

श्री रमांच्या जुन्या मूर्तीचा काय होणार याचे कुतूहल अनेक भाविकांच्या मनात होतं. अस सांगितलं जातं की अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहात नवीन मूर्तीसोबतच रामलल्ला यांची  जुनी मूर्ती सुद्धा बसवली जाईल. नवीन मूर्तीला अचल मुर्ती आणि जुन्या मूर्तीला उत्सव मुर्ती अस म्हटल जाईल.

 श्रीरामांच्या सर्व उत्सवात मिरवणुकीसाठी फक्त ही उत्सवमूर्ती बाहेर काढली जाईल. उत्सव मुर्ती भारताच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नेली जाईल. नवीन मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या गर्भगृहात बघायला मिळेल.

जुन्या आणि नवीन मूर्ती मध्ये काय फरक आहे तर श्री रामांच्या जुन्या मूर्तीची उंची खूपच कमी होती. भाविकांना दर्शनही घेता येत नव्हतं. पण आता श्री रामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती 51 इंच उंच असेल. तीस फुटांच्या अंतरावरून भाविकांना या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली आहे. 

नवीन मूर्ती भट्ट अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन मूर्तिकारांनी तयार केली आहे. 

या सोहळ्याची सिक्युरिटी कशी असेल :

अयोध्येतील राम मंदिर सुरक्षेसाठी सहा थरांची हाय सिक्युरीटी योजना तयार करण्यात आली आहे. जी20 शिखर परिषदेच्या सुरक्षेसारखी एक हायटेक सेक्युरिटी तयार केली आहे. काही जांनांच म्हणन आहे की संपूर्ण एरियात 600 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. ज्यात Ai टेक्नॉलॉजी आहे. श्री रामांच्या मूर्ती असलेल्या मुख्य मंदिराला कव्हर करायला रेड झोन असेल. इथे एकूण सात बॉम्बशोध पथक असतील. मंदिराजवळ एक स्पेशल कंट्रोल रूम बनवण्यात आली आहे जी भाविकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवेल. म्हणजे मुख मंदिर सोडून परिसराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि गल्लान मध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहे. आणि तिथे असलेल्या सेक्युरीटी ऑफिसर कंट्रोल रूमच्या संपर्कात असतील. यामुळे त्यांना उत्सवा च्या वेळी गर्दी नियंत्रणात  मदत होईल. 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळा नंतर अंदाजे एक लाखांपेक्षा जास्त लोकांची गर्दी होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. 


प्रभू श्री रामांसाठी काय काय भेटवस्तू येणार :

अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी भारतातुनच नाही तर परदेशातून सुद्धा भेटवस्तू येत आहेत. प्रभु श्रीरामांसाठी छत्तीसगडमधून 3000 क्विंटल तांदूळ भेट येणार आहे.  सोबतच नेपाळमध्ये असलेल्या त्यांच्या सासुरवाडी जनकपुर मधुन कपडे, फळ आणि सुकामेवा आणि त्यासोबत सजवलेल्या अकराशे थाळ्या येणार आहेत. याशिवाय नेपाळमधून 51 प्रकारची मिठाई, दही, लोणी आणि चांदीची भांडी असणार आहे. उत्तर प्रदेशातल्या एका जिल्ह्यातून एक खास अष्ट धातूंपासून बनवलेली घंटा दरबारात येणार आहे. ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल तिची किंमत की साधारण पंचवीस लाख रुपये एवढी असू शकते यासोबत प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरात मधल्या बडोदा मधुन 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवली जाते तिचे वजन साधारण पस्तीसशे किलो येवढं सांगितलं जातं आहे.

22 जानेवारीला तुम्ही अयोध्येला जाऊ शकाल का :

यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की 22 जानेवारीला निमंत्रण पत्रा शिवाय कोणीही आयोध्या येऊ शकनार नाही. जर कोणी बुकिंग केले असेल तर ते रद्द करतील. राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि काही सूचना जारी केल्या योगी आणि आदेश दिला की 22 जानेवारीला अयोध्यातील सर्व धर्मशाळा आणि हॉटेल चे प्रीबुकिंग रद्द करण्यात यावा. 22 जानेवारी चा सर्वांचा रद्द केला जाईल. या सोहळ्याचे निमंत्रण असेल तेच अयोध्येत येतील. तेथील निमंत्रण पत्र आणि ड्युटी पास असलेले अयोध्येत मध्ये प्रवेश करू शकतात. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या नंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सुरू असेल. बोल भिडू

Previous Post Next Post