आजचे हवामान अंदाज : राज्यात १० जानेवारी पर्यंत या जिह्यात होणार अवकाळी पाऊस


Whether report : राज्यातील तीन जानेवारी पासुन वातावरणात बदल दिसून येत आहे. वातावरणात होणारा बदल झाल्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नमस्कार शेतकरी मित्रानो ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेब यांनी आत्ताच दिलेल्या माहितनुसार राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. साहेबांनी सांगितल्यानुसार राज्यामध्ये पाच जानेवारी पासुन ते दहा जानेवारी पर्यंत पाऊस होणार आहे. दहा जानेवारी नंतर राज्यातील हवामान कोरडे राहील.


राज्यातील हवामान अंदाज नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, परभणी, नांदेड, लातूर, बार्शी, वाशिम, अमरावती, जालना, बीड, अहमदनगर, आणि उस्मानाबाद या जीह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडू शकतो. पुणे जिह्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लाऊ शकतो.


राज्यामध्ये अनेक जिह्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पंढरपूर, सोलापूर, बार्शी, येरमाळा, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर या जीह्यांमधे जास्त पाऊस पडू शकतो. पाथर्डी भागात सुद्धा पाऊस पडणार आहे. रिसोड, हिंगोली, वाशिम अकोला, लातूर या ठिकाणी ५ ते १० जानेवारी पर्यंत पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसुन तुरळक ठिकाणी पडणार आहे. वरील जिल्ह्यांमध्ये पाऊस हलक्या स्वरूपाचा असणार आहे. हा पाऊस पिकासाठी उत्तम ठरणार आहे.

दहा जानेवारी नंतर राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. या नंतर राज्यात २२ फेब्रुवारी ते १० मार्च च्या दरम्यान बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

-panjabarao dakh 

Havaman andaj maharastra


Previous Post Next Post