Rajarshi shahu maharaj scholarship : सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पदवी व व्यावसायिक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?, विद्यार्थी पात्रता काय असेल ?, अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ? या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.
शिष्यवृत्तीसाठी कोण कोण अर्ज करू शकतात :
१) मॅट्रिक, पदवी, आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
२) पदवीधर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ष बाद असेल तर ते या योजनेसाठी अपात्र असतील.
३) कुटुंबातील फक्त दोघा जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
१) विद्यार्थ्याकडे शाळेचे किंवा कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
२) आधार कार्ड (अपडेट असलेले)
३) तीन पासपोर्ट सायझ फोटो
४) प्रतिज्ञापत्र
५) चालु मोबाईल नंबर
६) स्वयं घोषणापत्र
७) जातीचा दाखला (असल्यास)
८) बँक पासबुक ( आधार कार्ड शी सलग्न असलेले )
९) उत्पन्न दाखला ( एका वर्षा करीता )
१०) दहावी आणि बारावी चे गुणपत्र
११) फी भरलेली पावती
शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी इथे
क्लिक करा
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा :
१) सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
२) त्यानंतर उजवीकडे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना हा पर्याय निवडायचा आहे.
३) तुमच्या समोर MAHADBT चे पेज उघडेल. पेज वरती उजव्या साइडला असलेले नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे.
४) त्यामध्ये तुमचे नाव, युजर नेम, आणि आठ अंकाचा पासवर्ड तयार करायचा आहे. खाली तुमचा ईमेल आयडी आणि भ्रमण ध्वनी क्रमांक प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करायची आहे.
५) त्यानंतर लॉगिन हा पर्याय निवडून तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
६) लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला वयक्तिक माहिती हा पर्याय निवडून तुमचे नाव, वडिलाचे नाव, आईचे नाव, संपूर्ण पत्ता, उत्त्पन दाखला क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी क्रमांक अशी संपूर्ण माहिती भरायची आहे.
७) संपूर्ण माहिती भरल्या नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना हा पर्याय निवडायचा आहे आणि त्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
८) त्यानंतर कागदपत्रे अपलोड कायची आहेत. कागदपत्र pdf फाईल प्रकारामध्ये अपलोड करायची आहेत.
९) शेवटी तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज पूर्ण करायचा आहे.
१०) अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्जाचा संकेतांक मिळेल तो संकेतांक तुमच्या कॉलेज मध्ये शिष्यवृत्ती डिपार्टमेंट ल जमा करायचा आहे.
अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुमच्या शिक्षणासाठी जेवढी फी भरली जाते त्या शुल्क नुसार तुम्हाला राज्य सरकार कडून तुमचे पैसे मिळतात. या योजने चे दोन हप्ते संपूर्ण कागदपत्रे पडताळणी झाल्यावर डायरेक्ट तुमच्या आधार कार्डशी सलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होते.
