nsdl Pan Card download : Pan Card मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसं करायचं जाणुन घ्या.

nsdl Pan Card download : Pan Card मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसं करायचं जाणुन घ्या.


nsdl pan card download : भारत आयकर विभागाच pan card प्रत्येकाकडे असणे आता खुप गरजेचे आहे. आयकर विभाग नुसार पॅन कार्ड आधार कार्डशी सलग्न करणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड हे ओळख पत्र अनेक शासकीय व्यवहार आणि खाजगी व्यवहार करीता उपयोगी पडते. या कार्ड वरती तुमच्या व्यवहाराची माहिती मिळते. तुमचे पॅन कार्ड हरवल्यास ते ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे आपण या लेखातून जाणुन घेणार आहोत. 


पॅन कार्ड ऑनलाईन download कसे करायचे :

१) पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करण्यासाठी तुमच्या पॅन कार्ड ला तुमचे आधार कार्ड सलग्न असेल पाहिजे.

२) सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या NSDL संकेतस्थळावर जायचे आहे. 

३) त्या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील (Home

Reprint Of PAN Card

Download e-PAN/ e-PAN XML

Know Status Of PAN Application)


४) वरील दिलेल्या पऱ्यायापैकी अधोरेखित केलेला पर्याय निवडा.

५) डाउनलोड ई पॅन हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला खाली दिलेला अर्ज भरायचा आहे त्यामध्ये हरवलेल्या पॅन कार्डचा दहा अंकी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आणि तुमचा जन्म दिनांक टाकून submit करायचा आहे.

६) यानंतर भरलेली सर्व माहिती बरोबर असल्यास तुम्हाला तुमच्या कार्ड ची संपूर्ण माहिती दिसेल. तुमचे pan card pdf पद्धतीने तुमच्या ईमेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती प्राप्त करण्यासाठी पर्याय निवडा.

७) नंतर generate otp या हा पर्याय निवडून तुमचे पॅन कार्ड मिळावा.


जर तुम्ही नवीन पॅन कार्ड साठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक टाकून कार्डची सद्यस्थिती पाहु शकता. तुमचे आधार कार्ड तयार झाले असेल तर तुम्ही ते वरील दिलेल्या माहतीनुसार प्राप्त करू शकता.  

Previous Post Next Post