UPI payment app rules 2024 : गूगल पे, फोन पे, आणि पेटीयम ऐप साठी हे आहेत नवीन नियम


UPI payment app rules 2024 : खिशातून मोबाईल काढला स्कॅन केलं आणि पेमेंट 2016 मध्ये झालेल्या नोटबंदी नंतर यूपीआय आपल्याला अगदी सवयीचं झाल आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ आकडेवारीनुसार 2023 4 नोव्हेंबर मध्ये 17 लाख कोटी व्यवहार युपीआय च्या माध्यमातून झाले आहेत पण आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून रिझर्व्ह बँकेनं यूपीआय व्यवहारांसाठी काही नियम आणले आहेत


युपीआय साठीचे नवीन नियम :

या नवीन नियमानुसार एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेले फोन पे गुगल पेटीएम आयडी बंद केले जातील. सोबतच काही ठराविक बाबतीत पेमेंटचा लिमिट देखील वाढवण्यात आले हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आता यूपीआय द्वारे एक लाख ऐवजी पाच लाखांपर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येईल.


पेटीएम किंवा फोन पे सारख्या कंपन्यांच्या वॉलेट मधुन पैसे ट्रान्सफर करत असताना आता 1.1 टक्क्यांचा ट्रान्सफर चार्ज लागणार आहे पण काळजी करू नका हा नियम केवळ व्यावसायिकांसाठी असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.


काही महिन्यांपूर्वी यूपीआय एटीएम ची घोषणा झाली होती देशभरात असे एटीएम सुरू झाल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड यूपी आयडी टाकून पैसे काढू शकता. अनेकदा चुकीचा नंबर वर पेमेंट होतं आणि आपण घाबरून जातो आता मात्र अशी चूक झाली तरी ते पैसे चार तासांच्या आत तुम्हाला परत मिळण्याची सोय करण्यात आली आहे.


नव्या नियमानुसार तुम्ही पहिल्यांदा एखाद्याला पैसे पाठवत असाल तर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी चार तास वाट पाहावी लागेल. या चार तासांमध्ये तुम्ही चुकीचा नंबर वर पाठवलेले पैसे परत देखील मिळू शकता. 

 

यूपी आय व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत ऑल इंडिया ऑफिसर्स फेडरेशन चे माजी जनरल सेक्रेटरी फॉर्मस फ्रों सांगतात की पूर्वी बँक खात्यातून व्यवहार व्हायचे आणि असे व्यवहार प्रेस करणं सोपं होतं पण आता पैसे कसे आणि कुठे जातात याचा पत्ता लागत नाही नुकतच खासदार दयानिधी मारन यांच्या खात्यातून एक लाख रुपये चोरीला गेले होते त्याबद्दल बातमीदेखील आली. मारन किंवा त्यांची पत्नी यांनी त्यांच्या दोघांनी बँक डीटेल्स कोणालाही दिले नव्हते बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत ते पैसे परत मिळवून दिले. पण सामान्य माणसांचे काय ? त्यांना खासदारांन सारखी वागणूक किंवा प्राथमिकता दिली. अशीच प्राथमिकता सरकारने सर्वसामान्य जनतेला मिळेल याचा देखील विचार केला पाहिजे. या नव्या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो यूपीआय वापर करणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख पाठवा.

Previous Post Next Post