मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये makarsankranti wishesh in Marathi

 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये makarsankranti wishesh in Marathi 



मकर सक्रांतीच्या शुभेच्छा : सूर्याचे उत्तरायण हे २२ डिसेंबरनंतर सुरू होते परंतु सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा १४ जानेवारीला होतो. प्राचीन काळापासून मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. उत्तरायण आणि मकर संक्रांत अतिशय प्राचीन काळी एकाच दिवशीं येत असावी, त्यामुळे आजही मकर संक्रांतीच्या दिवसाला उत्तरायण म्हटले जाते. यावर्षी मकर संक्रांत ही १५ तारखेला येत आहे. हा फरक दर ७२ वर्षाने होत असतो.



🌺🏵️तिळ गुळ घ्या गोड गोड बोला🏵️🌺भारतीय संस्कार प्रधान देश संत मुनी राम कृष्ण व शिवाजीमहाराज यांच्या पदांची पावण झालेली मातृ भुमी गंगा, यमूणा, सरस्वती, कृष्णा, कोयना नद्यां वाहातात आशी संस्कृती व संस्कार भारत देश माझा.



🏵️तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा सर्वांना सुख शांती समृद्धी व भरभराटीचे वर्षा होवो हीच प्रार्थना🌺🏵️



!! आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची !! 

 !! कणभर तीळ, मनभर प्रेम !!

!! गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा !!

!! तीळ गुळ घ्या गोड गोड बोला !!

🏵️ मकरंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🏵️



तीळ गुळ घेऊन गोड गोड बोलावे

माणसाला माणसाशी जोडावे !!

पतंग उडविण्यात मुले झाली दंग

घरोगरी पसरला संक्रांतीचा रंग !!

आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा

जुने वाद विसरून नातेसंबंध खुलवा !!

आला संक्रांतीचा अनोखा हा सण

सोबत्यासोबत सार भरावले मन !!

थंडीत पेटवून शेकोटी ऊब घ्यावी

प्रेमाची गुळ पापडी सर्वांना द्यावी !!

सूर्याचा मकर राशीत झाला प्रवेश

जोरदार थंडीचा संपला आवेश !!

सुगी येऊनी ठेपली माझ्या या दरात

आनंद निनांदे सृष्टीच्या चराचरात !!

उंच आभाळी उडवी यायची पतंग 

खरपूस भाकरीवर तीळ खमंग !!

तीळ गुळ खाऊन गाऊयात गोडवे

नव्या सुनेला भेट देऊयात जोडावे !!

क्षणोक्षणी जीवनी मिळावी प्रीत

मकरसंक्रांतीला गाऊया आनंदाचे गीत !!

🏵️ मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🏵️

उमा पाटील



🏵️बाजरीची भाकरी...त्याला भोगीची आमटी🏵️

🏵️तिळगुळाचे गोडी...त्यात पतंगाची जोडी..🏵️

🏵️सूर्याच्या तेजस्वी तेजाने.. लखलखत🌺

🌺राहो तुमच्या आयुष्याची होडी....🌺

१५ जानेवारी २०२४ च्या मकरसंक्रांतीच्या

आपणास हार्दिक शुभेच्छा !!🏵️



रंगीबेरंगी तीळ गुळाची जोडी

तिळा इतकेही दुःख न येवो कधी भेटी

तुमच्या आमच्या गोड नात्याची...🌺

फुलत राहो जोडी..!

हीच आमची सदिच्छा मकर सक्रांतीच्या दिनी..🌺🌺🏵️🙏




🌺सुहासिनीचा सण हा सौभाग्य शाली🌺

🏵️आकाशात उंच उडते पतंगाची जोडी..!🏵️

🌺मकर सक्रांतीच्या दिनी वाढो.....🌺

🌺तुमच्या आयुष्याला गोडी..

आमचे तीळ गूळ घ्या आणि

आमच्याशी गोड गोड बोला...🏵️🙏



💐🏵️मैत्रीचे बंध हे विश्वासाने जपायचे..

गोड गोड हलव्याच्या तीलगुळांने

हे नाते अखंड मधुर करायचे...

२०२४ या नूतन वर्षाच्या पहिल्या सणाच्या

आपणास शुभमय शुभेच्छा 💐🏵️



💐🏵️मार्गशीर्ष सरला

पौष नाव हर्ष घेऊन आला..

सर्वत्र नवा जल्लोष झाला..

रंगबेरंगी पतांगणे आनंद 

अवकाशात पसरला...

तीळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला 🌺💐



🏵️सूर्य आशेने उगवतो

पतंग डौलदारपणे आकाशात उडतो

मकर संक्रांतीचा सण हा नात्यामधला

आपलेपणा आणि आपुलकी वाढवतो🏵️



तिळा एवढी माया...🌺

गुळा एव्हढा गोडवा...🌺

वर्षातील पहिल्या सणाचा

हा आनंद आहे वेगळा...🌺

मकर संक्रांतीच्या आपणास

सोभाग्यमय शुभेच्छा...🏵️



Makar Sankranti subhecha in Marathi

Makar Sankranti wishes in Marathi

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy makar Sankranti wishes

Marathi text makar Sankranti 


Previous Post Next Post