रेशन कार्ड वरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा ? Ration card details online

रेशन कार्ड वरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा ? 
Ration card details online


Ration card : रेशन कार्ड धारकांना महिन्याला गहू, तांदूळ, हरभरा डाळ, साखर असे अनेक प्रकारचे धान्य सरकार कडून मिळते. पण आता रेशन कार्ड वरील सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने झाले आहे.  तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची माहिती ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता. कार्ड ची ऑनलाईन माहिती पाहण्यासाठी तुमच्या रेशन कर्डवरिल बारा अंकाचा रेशन क्रमांक असणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या कूपन वरची माहिती संकेस्थळावर कशी पहायची.


Ration card online details 



रेशन कार्ड वरील रेकॉर्ड ऑनलाईन : 

१) सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती अन्न व नागरी पुरवठा या राज्य सरकारच्या संकेतसथळावर म्हणजे mahafood.gov.in वर जायचे आहे. 

२) वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण असे मुखपृष्ठ दिसेल. मुखपृष्ठावर उजवीकडील असलेल्या ऑनलाईन सेवा या पर्याया खालील ऑनलाईन रास्तभाव हा पर्याय निवडायचा आहे.

३)त्यानंतर ऑनलाईन रास्त भाव दुकाने याखालील AePDS सर्व जिल्हे या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

४) पुढे आधार द्वारे वाटप योजना म्हणजे aadhar enable public distribution असा पृष्ठ उघडेल. त्यावरती डाव्या बाजूला रिपोर्ट या पर्यायाखाली rc details या पर्यायाला क्लिक करायचे आहे. त्यापर्याला क्लिक केल्या नंतर rc details च नवीन पेज उघडेल. तेथे तुम्हाला महिना वर्ष आणि तुमचा rc number म्हणजे तुमचा बारा अंकाचा रेशन कार्ड नंबर टाकून submit या बटणावर क्लिक करायचे आहे.


अशी सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची सर्व माहिती दिसेल. त्यावरती तुम्हाला तुमच्या कर्डवरती तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नावे दिसतील. तुमचे आधार कार्ड प्रमाणीकरण झालेली माहिती दिसेल. तुमचा जिल्हा तालुका गाव तुमचे कार्ड प्रकार कोणता आहे तेथे दिसते. सार्वजनिक वितरण प्रणाली योजने अंतर्गत मिळणाऱ्या दुकानाचा frc क्रमांक दिसेल. मागील महिन्यातील तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने अंगठ्याचा ठसा देवुन धान्य घेतले याची संपूर्ण माहिती दिसेल.

धान्याचा दर कसा पाहायचा :

रेशन कार्ड वरील धान्याचा दर पाहण्यासाठी तुम्हाला mahaepos.gov.in या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. या वेबसाईट वर गेल्यावर उजवीकडे policy centre या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील पेजवरती तुम्हाला रेशन कार्ड वरील मिळणाऱ्या संपूर्ण धान्याचे दर फलक दिसतील.

1 Comments

  1. अगदी सोप्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
Previous Post Next Post