Grampanchayat : ग्रामपंचायतीचं काम कसे चालतं
ग्रामपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एकूण चार प्रकार पडतात. या चार प्रकारचे कर्मचारी ग्रामपंचायतीचे काम करत असतात.
१) यामध्ये पहिला प्रकार पगारी कर्मचारी असतो. जिल्हा निवड समिती या कर्मचाऱ्याची निवड करते आणि राज्य सरकार त्यांना पगार देते. यामध्ये ग्रामसेवक जे ग्रामविकासाची काम करत असतात, तलाठी जे महसूलाशी संबंधित काम करत असतात. यांचा समावेश होतो.
२) दुसऱ्या प्रकारचे मानधन कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांना गावात काही विशिष्ट प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यासाठी त्यांना मानधन दिलं जात. यामध्ये अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस, पोलिस पाटील, कोतवाल यांचा समावेश होतो. आता या कर्मचाऱ्यांना त्यांचे त्यांचे विभाग मानधन देत असते. जसे पोलिस पटलांना गृहविभाग आणि कोतवाल यांना महसुल विभाग मानधन देतात.
३) तिसरा प्रकार असतो स्वयं प्रेरित कर्मचारी. यांना पगार किंवा मानधन नसतं. गावातील एखाद्या कामासाठी स्वयं पुढाकार घेऊन काम करत असतात. जेवढे काम तेवढा मोबदला त्यांना दिला जातो. यामध्ये अशा वर्कर, रोजगार सेवक यांचा समावेश असतो.
४) चौथा प्रकार असतो ग्रामपंचायत कर्मचारी. यामध्ये शिपाई, दिवाबत्ती, पाणी पुरवठा कर्मचारी, लिपिक सफाई कर्मचारी यांचा समावेश असतो.
गावाच्या लोकसंख्येनुसार किती कर्मचारी निवडायचे याचा निर्णय गावाने घ्यायचा असतो. तसेच त्यांना कोणत्या स्वरूपाचे काम द्यायचे आणि किती मानधन द्यायचा याचा ही निर्णय गावाने घ्यायचा असतो. आता जे पगारी कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मुख्यालय म्हणजे ज्या गावात काम करायचे आहे त्या गावात थांबणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना ११५० रुपये प्रति महिना घर भाडे व १००० हजार रुपये प्रवास खर्च दिला जातो. गावात कोणते कर्मचारी राहतात आणि कोणते कर्मचारी राहत नाही यासाठी गावातील ग्रामसभेला उपस्थित राहून ठराव घेतला जातो. त्यात तुम्ही सांगु शकता कोणते कर्मचारी गावात उपस्थित असतात की नाही त्यावरून त्यांना घरभाडे व प्रवासखर्च दिला जातो.
प्रत्येक शासकीय कार्यालय प्रमाणे ग्रामपंचायत मध्ये एक हालचाल रजिस्टर असते. यामध्ये ग्रामसेवक किती वाजता ऑफिस ला आले त्याची वेळ आणि सही करणे अपेक्षित असते. एखाद्या वेळेस मध्येच काही शासकीय काम निमित्त बाहेर जायचे असेल तर कोठे जायचे असते ते सुद्धा त्या रजिस्टर मध्ये नमूद करणे आवश्यक असते. त्याने गावातील लोकांना कळते की ग्रामसेवक कोठे गेलेले आहेत.
 |
| Village grampanchayat work |
ग्रामपंचायत सदस्यांना मानधन किती मिळते :
ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य यांना प्रत्येक बैठकीसाठी बैठक भत्ता म्हणुन २०० रुपये दिले सरकारकडून जातात. हे मानधन अडवांस मध्ये ग्रामपंचायत ल दिले जातात म्हणजे बैठक संपल्यावर लगेच त्याच्या खात्यावर २०० रुपये जमा करणे अपेक्षित असते. गावांमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांना गावच्या लोकसंख्येनुसार मानधन मिळत. जर गावाची लोकसंख्या २००० पेक्षा जास्त असेल तर सरपंचाला ३००० रुपये प्रति महा मानधन आणि उपसरपंच यांना १००० रुपये प्रति महिना मानधन देले जाते. गावाची लोकसंख्या २००० ते ८००० असेल तर सरपंचांना ४५०० रुपये तर उपसरपंच यांना १५०० रुपये प्रति महिना मानधन दिले जाते. गावाची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त असेल तर सरपंच ५००० रुपये आणि उपसरपंच यांना २००० रुपये प्रति महिना मानधन दिले जाते. सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात ७५% राज्य सरकार तर २५% मानधन ग्रामपंचायतीने स्वरीतीने देणे अपेक्षित असते.
विकासकामात कसं सहभागी व्हायचं :
गावांमध्ये गावाच्या विकासासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणे आवश्यक असते. तुम्ही पुढे दिल्या प्रमाणे गावाच्या विकासकामात सहभागी होऊ शकता.
१) गावात वर्षभरात किमान ४ ग्रामसभा भारतात त्यावेळी तुम्ही ग्रामसभेला हजर राहून गावच्या विकास संदर्भातील तुमचा संकल्पना प्रत्यक्षात मांडू शकता.
२) गावात वेगवेगळ्या ग्रामविकास समित्या असतात. यामध्ये रेशन दक्षता समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम आरोग्य समिती, ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता पोषण आहार समिती या समित्यांमध्ये भागीदारी करू शकता. आणि गावाच्या विकासकामात लक्ष घालवु शकता.
३) तिसरं म्हणजे अर्थातच नियमित तुम्ही घरपट्टी, पाणीपट्टी भरून गावाच्या विकास कामात हातभार लावू शकता.
विकासकामावर लक्ष कसे ठेवायचे :
गावातील एक सजन नागरिक म्हणून गावाच्या विकासाकडे लक्ष देणे आपले कर्तव्य आहे. खालील दिल्या प्रमाणे
१) ग्रामसभेच्या दोन दिवस आधी तुमचा लेखी प्रश्न ग्रामपंचायतीला देऊन, त्याची पोचपावती घेऊ शकता. ग्रामसभेत लेखी स्वरूपाचे प्रश्न विचारलेत, तेव्हाच तो प्रश्न आणि त्याचे उत्तर प्रोसेडींग मध्ये किंवा सभेच्या नोंदवही मध्ये नोंदवलं जात. तोंडी विचारलेल्या प्रश्न प्रोसिडींग मध्ये जात नाही.
२) जर तुम्हाला गावातील कुठल्याही कामा विषयी शंका असल्यास, तुम्ही माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय चा वापर करून कमासंबधित माहिती प्राप्त करू शकता.
३) तुम्ही जर नियमित पणे कर्ज भरत असाल तर दरवर्षी तुम्ही ग्रामपंचायतीला जमावखार्चाच पत्र मागु शकता. वर्षभरात ग्रामपंचायतीला किती पैसा आला, तो पैसा कोठून आला आणि त्याचा वापर ग्रामपंचायतीने कसा केला याचे जमाव खर्च पत्र कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना देणे बंधनकारक असते.
४) याशिवाय तुमच्या गावाचे रिपोर्ट कार्ड तुम्ही केंद्र सरकारच्या ई ग्राम स्वराज या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे पाहू शकता. यात सरकारं तुमच्या गावसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी किती निधी दिला आणि ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला याची सविस्तर माहिती दिली असते.