विहीर नोंदणी अर्ज pdf 2023 : नवीन विहीर खोदण्यासाठी सरकार कडून मिळणार ४ लाख रुपये अनुदान अगदी सोप्या पद्धतीने करा अर्ज

विहीर नोंदणी अर्ज pdf 2023 : नवीन विहीर खोदण्यासाठी सरकार कडून मिळणार ४ लाख रुपये अनुदान अगदी सोप्या पद्धतीने करा अर्ज 




 PoCRA vihir yojana : शेतकरी बांधवांनो सरकार राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडुन आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना नवीन विहीर साठी शासन आता चार लाखापर्यंत अनुदान देणार आहेत. कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना, अल्प आणि अत्यल्प जमीन धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 


महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मागेल त्याला विहीर या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील ? योजनेसाठी अर्ज नोंदणी कशी करायची ? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ? विहीर नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा ? या सर्व प्रश्नांचे सविस्तर माहिती या लेखातून तुम्हाला देणार आहेत.


Navin vihir anudan 2023 : विहीर योजनेसाठी शेतकरी पात्रता १) शेतकऱ्याकडे स्वतः च्या नावाचा 0.40 आर क्षेत्रा पेक्षा जास्त जमीन असावी.

२) विहीर नोंदणी साठी अल्प भु धारक शेतकऱ्याकडे १ एकर जमीन आणि अत्यल्प भु धारक शेतकऱ्याकडे ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ते पात्र असतील.

३) शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा (१.५०) कमी असावे. 

४) प्रस्तावित विहीर नोंदणी क्षेत्राच्या ५०० मीटर अंतरावर सार्वजनिक पाण्याचा स्रोत असावा.

५) दोन विहिरीच्या मधील अंतर हे १५० मीटर पेक्षा जास्त असावे.

६) संरक्षित सिंचन प्रकल्प अंतर्गत लाभ मिळालेल्या आणि इतर कोणत्याही घटकातुन लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

७) या योजनेसाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ३.५० लाख आणि इतर शेतकऱ्यांना २.५० लाख इतके अनुदान मिळते.


विहीर अर्ज नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे : 

१) ७/१२ उतारा, ८ अ

४) रहवाशी दाखला.

५) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणे कडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.

६) नवीन विहीर खोदण्यासाठी आणि सर्व अनुज्ञेय पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.


नवीन विहीर नोंदणी :

नवीन विहीर नोंदणी दोन प्रकारे करता येते. अर्ज करण्याची तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायींमध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज घ्या. त्या अर्जावर संपूर्ण माहिती भरा. वरील दिल्या प्रमाणे कागदपत्रे जोडा. आणि तो अर्ज प्रस्ताव तयार करण्यासाठी गावच्या ग्रामपंचात कार्यालयात जमा करा. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्या नंतर तुम्हाला कळवले जाईल.


नवीन विहीर ऑनलाईन अर्ज नोंदणी कशी करायची :


नवीन विहीर अर्ज pdf : विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.  त्यासाठी तुम्हाला सरकारच्या PoCRA https://dbt.mahapocra.gov.in/ या वेबसाईट वरती जायचे आहे. तुमचे registration पुर्ण करुन या योजनेसाठी पात्र असलेल्या तुम्हाला संदेश द्वारे कळवले जाईल. PoCRA Scheme list 


नवीन विहीर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 



Previous Post Next Post