नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल
महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देणार आहे. नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्य सरकार अल्प जमीन धारकांना वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे. केंद्र सरकार कडून राबवत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळत असलेल्या वर्षाला सहा हजार प्रमाणे देशभरात अकरा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
| Maharashtra namo shetkari yojana |
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी काय करावे. ज्याच्या नावाचा सातबारा आहे त्यांना या योजनेसाठी सहज नोंदणी करता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना च नमो योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी नवीन नोंदणी करण्यासाठी csc केंद्रामध्ये जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे अपडेट केलेलं आधार कार्ड, तुमचा गट नंबर, चालू मोबाईल नंबर आणि सातबारा आठ नंबर असे सर्व कागदपत्र असावेत.
ज्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत होते पण शेवटच्या दोन हप्ते मिळाले नाहीत त्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाकून स्टेटस चेक करावे. Pm Kisan sanman nidhi yojana तुमच्या ज्या बँक खात्याला आधार कार्ड मॅप नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याला मॅपिंग करावे लागेल.
ज्यांचे आधार कार्ड मॅपिंग होत नसेल त्यांनी पोस्ट बँकेत खाते नवीन खाते उघडून घावे आणि नंतर तुमची ekyc पूर्ण करून घ्यावी या प्रक्रिये नंतर पंधरा दिवसा नंतर तुमचे थकीत हप्ते पडतील.
ज्या शेतकऱ्यांचे land seeding No असे स्टेटस दाखवीत आहे त्यांनी तुमच्या स्टेटस च झेरॉक्स आणि तुमच्या नावाचा सातबारा घेवुन तुमच्या तहसील कार्यालयाला भेट देवून तुमचे स्टेटस दुरुस्त करून घेऊ शकता. अश्या प्रकारे सर्व शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ मिळेल.
Namo shetkari yojana