अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात पाहा यादीत तुमचे नाव.
CM Of Maharashtra राज्यात अवकाळी पावसामुळे विदर्भ मराठवाडा विभागात पावसामुळं पिकांचं नुकसान झाले आहे. कापुस, तूर, कांदा अशा खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
सध्या राज्यात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्यात येणार आहेत. तुम्ही खरीप हंगामातील भरलेला विमा सरकार मंजूर करून देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला विमा भरलेल्या पावत्या तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री साहेबांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसानाची भरपाई डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. तेथील सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. सर्व पंचनामे करणार मुख्यमंत्री साहेब माध्यमांशी बोलताना म्हणाले की अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसनाचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. ३ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे.
तसेच संबंधित पालकमंत्र्यांनी स्वतः आपल्या विभागातील शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांना दिलासा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
"आपले सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही."
