
नानाजी देशमुख कृषी साजीवनी प्रकल्प nanaji Deshmukh krushi Sanjivani prakalp
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयक कृती आराखड्यामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे.
तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभू-धारक शेतकयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
लाभार्थी निवडीचे निकष:
१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या समूहांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी समूह या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. लाभार्थी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. तसेच त्यांची जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असावेत.
३. सामुदायिक शेततळे दोन अथवा अधिक लाभार्थीनी करणे आवश्यक आहे, समूहातील सर्व लाभार्थी हे अत्यल्प/अल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
४. जेवढे क्षेत्र लाभार्थी समूहाकडे असेल तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेच्या सामुदायिक शेततळे घेता येईल.
५. निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
६. शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल लाभार्थीमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करावा
७. शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्यांच्या समूहाने विहीत आकारमानानुसार स्वतः इनलेट आउटलेट विरहीत सामुदायिक शेततळे केले असल्यास त्याबाबत खात्री करून घ्यावी
सामुदायिक शेततळ्याचे प्रकार:
१) मॉडेल क्र. १: २ मी. खोदकाम व ३ मी. बाांधाची उांची (हाफ डगआऊट-Half Dugout)
२) मॉडेल क्र. २: पूर्णपणे खोदकाम करून करण्याचे शेततळे (फु ल्ली डगआऊट-Fully Dugout)
अर्ज कोठे करायचा :
१. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे हमीपत्रासह अपलोड करावीत.
२. मार्गदर्शक सुचना मध्ये दिलेल्या आराखड्याप्रमाणे (Design) व तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.
३. लाभार्थ्याने स्वतः मजुराद्वारे/अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी, पोकलेन सारखे मशिन्स) सहाय्याने शेततळे पूर्ण करावयाचे आहे. याकरीता आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही.