Masked Aadhar आधार कार्ड हे ओळखपत्र आपल्याला खुप गरजेचे आहे. आधार कार्ड आणि pan card या दोन ओळखपत्र आता खूप गरजेचे झाले आहे. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर त होत नाही ना ? आपली ओळखपत्र माहिती खाजगी ठेवण्यासाठी आता मास्क आधार कार्ड वापरता येणार आहे.
मास्क आधार कार्ड म्हणजे तुमच्या आधार कर्डवरील आधार नंबर जो युनिकआयडेंटिटी नंबर आहे तो संपूर्ण दिसणार नाही. आधार नंबर बारा अंकी आहे त्यामधील पाहिले आठ अंक x ने लपविले जातात आणि तुमच्या आधार नंबर चे शेवटचे चार अंक दिसतात. उदा. XXXXXXXX1234 अश्या प्रकारे दिसतात.
![]() |
| Aadhar card |
तुमच्या आधार कार्ड छा गैरवापर थांबवण्यासाठी तुम्हाला तुमचे मास्क आधार कार्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. कोणीही तुमचा आधार कार्ड नंबर किंवा झेरॉक्स मागितल्यावर सर्व सुरक्षित पडताळणी करूनच तुमचा ओळख क्रमांक द्यावा.
Download Masked Aadhar आता तुमचे मास्क आधार कार्ड डाऊनलोड कशा प्रकारे करायचे. सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड उपडेट केलेलं असेल तर तुम्ही तुमचं मास्क आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता. मास्क आधार प्राप्त करण्यासाठी तुम्ही आधार अपडेट सेंटर वर सुद्धा भेट देऊ शकता.
Mobile Aadhar Number तुम्ही तुमच्या मोबाईल वरती ही मास्क आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर Google वरती UIDAI असे सर्च केल्यावर त्या वेबसाईटवर जाऊन आधार लॉगिन वरती क्लिक करून तुमचा बारा अंकी आधार नंबर प्रविष्ट केल्यावर नंतर CAPTCHA टाकल्यावर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल वरती OTP पासवर्ड येईल. तो पासवर्ड प्रविष्ट केल्यावर तुम्ही आधार संबंधित अनेक सेवा चा लाभ घेऊ शकता. E Aadhar या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचे मास्क आधार कार्ड प्राप्त करू घ्या. आणि तुमचा आधार कार्ड चा गैरवापर थांबवा.

Thanks
ReplyDelete