पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यंदा त्या अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपर्जोय वादळामुळे आपल्या देशात मान्सून महाराष्ट्रामध्ये यायला थोडा वेळ झाला. पण आता आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यास सुरू झाला आहे.
कालपासून महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. अमरावती पुणे नाशिक येथे आज पाऊस झाला आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भात बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे.
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये जमिनीत एक फूट ओल झाल्यावर पेरणी करण्यास काही हरकत नाही कापूस तूर सोयाबीन पिकाच्या पेरणीचा वेळ अजून गेलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त टेंशन घेण्याची काही गरज नाही.
या वर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडणार आहे असे महाराष्ट्रातील हवामान खात्याने सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त झाडे लावावी.
