Crop insurance claim : ऑनलाईन मोबाइल वर पहा प्रधानमंत्री पिक विमा मंजुर झाला की नाही अगदी सोप्या पदधतीने
PM-KISAN Fasal Bima Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही दरवर्षी प्रधानमंत्री किसान पिक विमा योजने अंतर्गत रब्बी व खरीप या दोन हंगामामध्ये पिक विमा भरीत असतात. पण तुम्हाला पिक विमा मंजुर झाला आहे की नाही आता ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर जाणुन घेता येणार आहे. आजच्या या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजुर झाला की नाही अगदी सोप्या पदधतीने सांगणार आहे.
Crop insurance company :
प्रधानमंत्री किसान पिक विमा योजने अंतर्गत आपण जो पिक विमा भरतो तो पाहण्यासाठी सरकारचे अधिकृत सकेतस्थळावर जाऊन आपण पाहु शकतो खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
Pmfby : सर्वात प्रथम तुम्ही पिक विमा भरलेली पावती तुमच्या कडे विमा मंजुर झाला की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या जवळ पाहिजे. तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटवर जाऊन pmfby.gov या वेबसाईट वर जा. तेथे तुम्ही नवीन पिक विम्यासाठी पण नोंदणी करू शकता. तेथे वर उजव्या बाजूला जाऊन मराठी भाषा निवडा. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अर्ज मजुरी हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या समोर नोंदणी क्रमांक टाका असे येईल. तुमच्या जवळ असलेल्या विम्याच्या पावतीवरील एकवीस अंकाचा application number तो तेथे टाका.
कापच्या भरा म्हणजे तेथे दिलेल्या फोटोमधील इंग्रजी अक्षर जसेच्या तसे रिकामी जागेत टाका. आणि get status या बटणावर क्लिक करा.
