महावितरण - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार सन २०२३-२४ साठी प्रशिक्षणार्थीची भरती करणे. अहमदनगर मंडळातर्गत सर्व विभागांमध्ये सन २०२३-२४ या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार भरती करावयाचे आहे. त्यांची पदसंख्या तसेच अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
@पदाचे नाव - लाईनमन
अनु. जाती - १४
अनु. जमाती - १४
खुले / इतर - २६३
एकुण जागा - २९१
@पदाचे नाव - कॉम्प्युटर ऑपरेटर
एकुण जागा - २९
अटी व शर्ती
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय.
१) वयोमर्यादा : वर्ष १८ ते ३० (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम).
(२) उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
(३) कामाचे ठिकाण- अहमदनगर जिल्ह्यात कोठेही
(४) शैक्षणिक पात्रता : १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक
(५) कागदपत्र जमा करणेपूर्वी अर्जदाराने शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक
(६) उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, आय.टी.आय./कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टेंट सर्व संत्रांचे गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र ( लागु असल्यास), आधारकार्ड व अप्रेंटीस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि.१६.०५. २०२३ ते १७.०५.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत आणावीत. अपूर्ण कागदपत्रे / माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
(७) प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत 'घेणे बंधनकारक नाही.
(८) जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागामध्ये अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रदद् करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे.
(९) अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य
(१०) महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य.
पत्ता- अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर. ४१४००१.
