Mahadbt Tractor scheme 2023 : शेतकऱ्यांना सरकार कडून मिळणार ट्रॅक्टरसाठी 1.25 लाखाचे अनुदान मे १५ च्या अगोदर करा अर्ज

शेतकऱ्यांना सरकार कडून मिळणार ट्रॅक्टर मे १५ च्या अगोदर करा अर्ज





नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फुल उत्पादन साठी पॉली हाऊस, अश्या अनेक सरकारी स्कीम साठी अर्ज नोंदणी सुरू आहे. १५ मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी करून घ्यावी नंतर अर्ज केलेल्या बाबी १५ तारखेच्या नंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. सरकारच्या ऑफिसियल संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या सर्व बाबींसाठी अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहु


Farmer Tractor : सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सन 2023-24 मध्ये कृषी विभागातील योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी अजून पर्यंत ऑनलाईन महाडीबीटीवर अर्ज सादर केलेला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी कांदाचाळ, वैयक्तिक शेततळे , शेततळे अस्तरीकरण,ठिबक व तुषार सिंचन,यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजारे , स्वयंचलित अवजारे , मोठ्या (५एकरपेक्षा जास्त क्षेत्र नावे असणारे) शेतक-यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यासह इतर सर्व योजनांसाठी तातडीने ऑनलाईन अर्ज करून घ्यावेत ही विनंती...लवकरच सर्व योजनांची नवीन सोडत(लकी ड्रॉ) होणार आहे.

अर्ज कसा करायचा

सरकारचे अधिकृत संकेतस्थळ mahadbt.gov या संकेतसथळावर जाऊन तुम्ही आधार कार्ड च्यां मदतीने नोंदणी करू शकता. नवीन अर्जदार नोंदणी करा हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या मोबाईलवर नोंदणी करू शकता नोंदणी केल्यावर लॉगिन करा आणि सर्वात प्रथम तुमची प्रोफाइल पुर्ण करा त्यामध्ये तुमचा संपूर्ण नाव, मोबाईल नंबर ईमेल आयडी, तुमचा संपूर्ण पत्ता, गट नंबर, आठ नंबर, ज्या बँक खात्याशी आधार लिंक असेल त्या बँक खात्याचा नंबर अशी सर्व माहिती भरून तुमचे प्रोफाइल पुर्ण करा. त्यानंतर तुमची कौटुंबिक माहिती भरा. अर्ज करण्यासाठी मेनू मध्ये जाऊन नवीन अर्ज पर्याय निवडून तुमच्या आवडीच्या बाबी भरा तुम्ही एकाच अर्जामध्ये सर्व बाबी साठी अर्ज करू शकता. नंतर अर्ज पुर्ण करण्यासाठी चलन ऑनलाईन पद्धतीने फोन पे युपिआय किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड तर्फे ऑनलाईन पेमेंट करून तुमचा अर्ज सबमिट करा. तुमच्या अर्जामध्ये काही बदल करण्यासाठी अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासठी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हे पाहु शकता. तुमचा अर्ज जर मंजुर झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज व्दारे कळविण्यात येईल. जर तुम्हाला हा अर्ज मोबाईल वर ऑनलाईन भरायला जमत नसेल तर लवकर तुमच्या जवळच्या आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची अर्ज नोंदणी करू शकता. धन्यवाद.


Tractor scheme 2023 या

 योजनेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी

 येथे क्लिक करा.



Previous Post Next Post