2000 हजार रुपयाची नोट चलनातून बाद ! या तारखेच्या आता करा बँकेत जमा
नमस्कार मित्रांनो आता चलनामध्ये नोटा बाद झाल्या आहेत काय आहे नोटबंदी आपण याविषयी सविस्तर माहिती या ब्लॉग मधुन पाहणार आहोत. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी एती हासिक निर्णय घेतला होता म्हणजे 2016 या वर्षी 8 November ला रात्री बारा च्या पुढे चलनातून 1000 हजारांच्या आणि 500 च्या नोटा बाद झाल्या होत्या. त्याच प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवीन जीआर आला आहे तो काय आहे आपण ते पाहणार आहोत.
मित्रांनो चलनातून 1000 हजार आणि 500 क्या नोट बंदी झाल्यामुळे देशातील व्यवहार चलन बाजारात चलनाचा तुटवडा होऊ नये व्यवहार सुरळीत चालावे व बंद झालेल्या नोटांची उणीव भासू नये म्हणून सरकारने मोठे चलन म्हणजे 2000 ची नोट बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. 2017, 18, आणि 19 या वर्षी देशात 2000 हजारांच्या नोटांची छपाई केली होती 2019 नंतर 2000 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंदी केली होती. तसेच 2017 या वर्षी एकुण 357 कोटी नोटा छापल्या होत्या 2018 या वर्षी 17 कोटी नोटा छापल्या होत्या आणि 2019 या वर्षी 10 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले की त्यांनी केलेल्या देशातील सर्वेनुसार देशात दोन हजार रुपयाच्या नोटेचा वापर 2020 या वर्षी 37.80 टक्के वापर दोन हजार रुपयांच्या नोटीचा व्यवहारात होता पण आता तो 2023 या वर्षी त्याची टक्केवारी 10.60 टक्के इतकी झाली आहे जवळ जवळ दोन हजाराची नोट आता व्यवहारात त्या नोटीच वापर आता खूप कमी झाला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपयांच्या नोटा जर तुमच्या पाशी असतील तर त्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकेतून बदलून घ्याव्यात. 30 सप्टेंबर 2023 ही त्यांनी नोट बदलवण्याची शेवटची तारीख दिली आहे. ही तारीख आणखी वाढू पण शकते पण जर तुमच्याकडे 2000 हजार रुपयांच्या नोटा असतील तर लवकर बदलून घ्याव्यात. बँकमधून 2000 रुपयाच्या नोटा तुम्हाला लगेच बदलून घ्यायच्या असतील तर तुम्ही फक्त वीस हजार रुपयांच्या च नोटा बदलून घेवू शकता. आणि जर तुम्हाला 2000 हजारांच्या नोटा तुमच्या खात्यात डीपोजित करायच्या असतील त्याला बंधन नाही तुम्ही तुमच्या कडे असतील तेवढ्या नोटा बँकेत जमा करू शकता.
