तुमच्याकडे फोन नसेल, 'तर तुम्हाला रेशनचे धान्य मिळणार नाही' असे मला रेशन दुकानदाराने सांगितले आहे. अशा पद्धतीने मला माझ्या हक्काचे धान्य नाकारले जाऊ शकते का?
तुमचा रेशन दुकानदार अशी सक्ती करू शकत नाही. शिधापत्रिका (रेशन कार्ड) हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शिधावाटप संबंधीच्या सरकारी योजनांचा फायदा घेताना पात्र व्यक्तींना हे कार्ड दाखवावे लागते. बँकेत खाते उघडण्यासाठी शाळा, महाविद्यालयात घराचा पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर करण्यात येतो. गरीब कुटुंबांना महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते. आधारपूर्वी महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून रेशन कार्डला महत्व होते. देशातील विविध राज्यात रेशनकार्डबाबत वेगवेगळी धोरण आहेत. सरकारी योजनांचे फायदेही राज्यपरत्वे बदलतात. New ration card
भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त चार प्रकारची रेशनकार्ड असतात. या कार्डाची ओळख त्यांच्या रंगानुसार होते. निळे, गुलाबी, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असते. उत्पन्न गटानुसार, मिळकत, कमाईनुसार विशिष्ट समाज गटांना विशिष्ट रंगाचे रेशन कार्ड देण्यात येते. या कार्डवरील धान्य मिळविण्यासाठी स्मार्ट फोनची गरज नसते. स्वस्त धान्य दुकानदारांकडे 'पॉस' मशीनद्वारे ग्राहकांना धान्याचे वाटप केले जाते. या मशीनमध्ये अंगठ्याचा ठसा घेऊन कार्डधारकांना धान्याचे वाटप केले जाते. Link aadhar card to ration card
सरकारी यंत्रणांना कार्डधारकांशी संवाद साधायचा असेल तर ते मेसेजद्वारे आदेशाची माहिती कार्डधारकांना देतात. त्यामुळे स्मार्टफोन असण्याचा आणि धान्य मिळण्याचा काहीही संबंध नाही. धान्य मिळविण्यासाठी शहरी भागात एकत्र कुटुंबाचे उत्पन्न ५५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या कुटुंबाला धान्य दिले जाते. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत एका कार्डधारकाला १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे धान्य दिले जाते. प्राधान्य गटाला प्रत्येक माणसाला २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिला जातो. तुम्ही इतर निकषात बसत असाल, तर तुमच्याकडे स्मार्टफोन नाही म्हणून तुमचा रेशन दुकानदार तुम्हाला धान्य नाकारू शकत नाही
