१९८५ पासूनचे खरेदीखत पाहा ऑनलाईन तुमच्या मोबाईल वर Online land record Maharashtra
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद अवश्य पाहायला सांगतात. ते म्हणजे खरेदी खत.
खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना व्यवहार झाला याची सविस्तर माहिती असते.
खरेदी खत झालं की ती माहिती फेरफार उताऱ्यावर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.आता हेच १९८५ पासूनचे खरेदी खत तुम्ही तुमच्या मोबाईल २ मिनिटांत पाहू शकता. तुमच्या मोबाईलवर खरेदी खत ऑनलाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप नुसार कृती करा.
खरेदी खत ऑनलाईन :-
१) सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर igrmaharashtra.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. वेब साईट वरती गेल्यावर नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन चे अधिकृत मुख्यपृष्ठ दिसेल.
२) त्यानंतर डाव्या बाजूला ऑनलाईन सेवा या पर्याय खालील अभिलेख व भरणा या पर्याय खालील ई शोधा हा पर्याय निवडा त्यानंतर विनाशुल्क शोध १.९ हा पर्याय निवडा.
३) त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये मिळकत निहाय व दस्त निहाय या पर्यायपैकी मिळकत निहाय हा पर्याय निवडा.
४) पुढे तुम्हाला मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शहरी भाग असे तीन पर्याय दिसतील जर तुम्ही मुंबई चे रहवासी असाल तर तुम्ही मुंबई हा पर्याय निवडा. तुम्ही जर महाराष्ट्रातील शहरी भागातून असताल तर तुम्ही महाराष्ट्र शहरी भाग हा पर्याय निवडू शकता. आणि जर तुम्ही खेडे गावाचे राहवसी असल तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
५) त्यानंतर मिळकत तपशील हा फॉर्म भरा त्यामध्ये तुमच्या जमिनीचा व्यवहार कोणत्या वर्षी झाला आहे ते वर्ष निवडा १९८५ पासूनचे खरेदीखत तुम्ही पाहू शकता. नंतर जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा. तुमच्या जमिनीचा मिळकत क्रमांक म्हणजे सर्व्हे नंबर/गट नंबर टाका. नंतर CAPTCHA म्हणजे समोर दिसणारे अंक जसेच्या तसे त्या चौकटीत भरा. जर तुमच्याकडे गट नंबर नसल्यास तुम्ही Do you want to name based search ya पर्यायाला yes हा पर्याय निवडून तुमचे नाव टाकून मिळकत तपशील पाहू शकता. सर्व माहिती भरल्यावर शोधा हा पर्याय निवडून तुम्ही तुमचे खरेदी खत पही शकता.
त्या दस्तावेज मध्ये तुम्हाला दस्ताचे नाव, क्रमांक, कोणत्या तारखेला खरेदी झाली, कोणत्या ठिकाणी झाली, जमीन देणाऱ्याचे नाव जमीन घेणाऱ्या चे नाव, किती क्षेत्रावर खरेदी झाली अशी सर्व माहिती खरेदी खतावरती दिसेल. ते खरेदी खत तुम्ही index पर्याय निवडून प्राप्त करू शकता.

