Kusum solar yojna : पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेसाठी अशी करा नोंदणी


Kusum solar yojna : पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेसाठी अशी करा नोंदणी 


Kusum solar energy २०२३ : नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारने दिवसा शेतकऱ्यांना शेतीच्या विकासासाठी सोलर पंप योजना सुरू केली आहे. शेतकरी विजेवर अवलंबून न राहता सोलर पंप क्या मार्फत पिकांना पाणी देऊ शकतो. या योजनेसाठी सरकार सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९० टक्के व अनुसूचित जाती जमातीसाठी ९५ टक्के अनुदान मिळते. तर या योजनेसाठी मोबाइलवर अर्ज नोंदणी कशी करायची ते आपण या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत.


Kusun online registration : कुसुम सोलर पंप या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपि आणि साडे सात एच पी असे पंपासाठी अर्ज करता येतो. त्यातील तीन एच पी याची एकुण किंमत १,९३,८०३ रुपये इतके आहे. सर्वसाधारण प्रवर्गला १९,३८० रुपये भरावे लागतात आणि एससी/एसटी यांना ९,६९० रुपये भरावे लागतात. तसेच  5HP पंपाची एकुण किंमत २,६९,७४६ रुपये आहे यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६,९७५ व एससी/एसटी प्रवर्ग यांना १३,४८८ रुपये भरावे लागतात. 7HP पंपासाठी एकुण रक्कम  3,७४,७०२ रुपये आहे. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३७,४४० रुपये भरावे लागतात आणि एससी/एसटी प्रवर्ग यांना १८,७२० रुपये इतकी रक्कम भरावी लागते. अर्ज करण्यासाठी लागणारी कोणती  कागदपत्रे लागणार आहेत ते खाली देले आहे.


१. सर्वात मह्त्वाचे म्हणजे तुमच्या सातबारा उताऱ्यावर विहीर, कूपनलिका या पाण्याच्या स्रोतांची नोदणी असली पाहिजे.

२. सामाईक सातबारा असेल तर २००  रुपयाच्या बोंडवर इतर भोगवतादरांचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे.

३. आधार कार्ड

४. बँकेचे पासबुक

५. पासपोर्ट साइज् फोटो

६. जातीचा दाखला असेल तर

Kusum online apply : शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahaurja.gov या संकेतसथळावर जावे लागेल. तेथे गेल्यावर उजव्या बाजूला कुसुम सोलर योजना नवीन नोंदणी हा पर्याय निवडून तुम्ही पाहिले पाण्यासाठी काय वापरतात यामधे इंजिन, मोटार हा पर्याय निवडा. पुढे तुमच्या सतबऱ्याचा माहिती भरा. तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP पासवर्ड टाका. कोणता पंप घ्यायचा तो पर्याय निवडा नंतर पंपचा तपशील पाहून पुर्ण करा. शेवटी या अर्जासाठी शुल्क १०० रुपये तुम्ही upi, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून ऑनलाईन पैसे भरा. तुमचा प्रथम नोदणी क्रमांक आणि पासवर्ड जपुन ठेवा. नंतर जेव्हा तुमच्या जिल्ह्यात साठा उपलब्ध होईन तेव्हा तुम्हाला संदेश व्दारे कळविण्यात येईन. तुमचा प्रथम नोंदणी क्रमांक टाकून तुम्ही पैसे भरणे कागपत्रे अपलोड करू शकता.


Previous Post Next Post