पाऊस आल्यावर लाईट का जाते ?


पाऊस आल्यावर लाईट का जाते ?

नमस्कार शेतकरी बांधवांनो लहानपणी कस व्हायचं पावसाचं वातावरण तयार झाल की लयभारी वाटायचं. त्या वातावरणात कुठतरी क्रिकेट खेळायला जावं अस वाटायचं पण घरचे म्हणायचे आधी अभ्यास करून घे लाईट जाईल. वारा वादळ सुटलं की लाईट आहे का गेली असा एक डोळा त्या लाईटकडे असायचा. एकदा का लाईट गेली की मोबाईल मधल इंटरनेट गडायच. पण तुम्हाला माहीत आहे का चार थेंब आल्यावर, पाऊस आल्यावर लाईट का जाते ?


आपल्याला जो तारेंच्या मार्फत विद्युत प्रवाह येतो तो AC करंट म्हणजे अल्टर करंट असतो AC करंट साठवून ठेवता येत नाही म्हणून तो सतत चालु असतो. जो आपण इन्व्हर्टर मध्ये असतो तो DC करंट म्हणजे डायरेक्ट करंट असतो तो साठवुन ठेवता येतो


पाऊस आल्यावर लाईट का जाते यावर महावितरण मंडळाचे अधिकारी म्हणतात की लाईट क्या खंब्यावर जे विद्युत विरहित चिनी मातीचे कवच असते ते उन्हाने खुप तापल्यानंतर त्यावर पाऊस पडल्यानं त्यांना तढा जातो आणि वीज खंब्यात उतरण्याची भीती असते. पाऊस आल्यावर पाण्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या DP उडण्याची शक्यता असते. वादळामुळे विद्युत तारेच्या जवळ असणारे झाड त्यावर कोसळून विद्युत प्रवाह खंडित होऊ शकतो. यामुळे महावितरण पाऊसाने चिन्ह दिसले की सुसज्ज होऊन लाईट बंद करतात.



Previous Post Next Post