एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत योजना लागू 50



 आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सूट देण्याची घोषणा केलेली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत परिपत्रक जाहीर करून तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्फत देखील परिपत्रक जाहीर करून योजनेला मान्यता दिलेली होती. महाराष्ट्र राज्याच्या 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आलेली होती. या योजनेचे नाव महिला सन्मान योजना असून या योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सूट मिळणार असून या योजनेचा अधिकृत शासन निर्णय आता जाहीर झालेला असून महिलांना केवळ ज्या ठिकाणी प्रवास केल्यास 50 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे ST Bus News Maharashtra याबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत योजना लागू 50 percent discount scheme on ST travel fare

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना सरसकट एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 17 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यभरात ही महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. आज प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार नवीन मार्गदर्शक सूचना या mahila samman yojana अंतर्गत ठरवून देण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांना कोणत्या प्रवासामध्ये 50 टक्के सूट मिळणार कोणत्या परिस्थिती मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती या शासन निर्णय च्या माध्यमातून जाहीर झालेली आहे.

1 Comments

Previous Post Next Post